खुळ मनं माझ तुझ्या माग लागल” हे मधुर मराठी प्रेमगीत. येथे वाचा या गाण्याचे संपूर्ण बोल आणि ऐका सुंदर व्हिडिओसह
खुळ मनं माझ तुझ्या माग लागल – गाण्याची माहिती
गायक: Ravindra Khomane & Anuja Deore
गीतकार: Swapnali Bharate
संगीतकार: Tushar-Rupesh & Sarvesh Sable
खुळ मनं
साजिरी गोजिरी पोर ही देखणी
गाला मधे लाजते साजणा पाहुनी
नजरेन नजरेला होकार दिला
एकटक पाहतो सारखं तिला
चालताना सोबतीन भान हरपल
खुळ मनं माझ तुझ्या माग लागल
मधाळ बोलणं लचकत चालणं
विचारा मंधी तुझ्या ऐकलंच हसणं
जन्माच्या गाठीच हे घालतो मी मागणं
देवा म्होर साकड घालतोया वाकून
चालताना सोबतीन भान हरलं
खुळ मनं माझ तुझ्या माग लागल
विणल नातं हे दोन जीवाचं दोन जीवाचं..
माथ्यावरी कुंकू राया तुझ्या नावाचं तुझ्या नावाचं..
हळदीन माखुनिया तुझ्या मंदी रंगले
येडं माझ काळीज मी तुझ्या मंदी गुंतले
चालताना सोबतीन भान हरपल…
खुळ मनं माझ तुझ्या….
खुळ मनं माझ तुझ्या माग लागल..







Leave a Reply